MHADAs process is transparent don't fall prey to anyone's fraud said Deputy CM 
पुणे

म्हाडाच्या सदनिकांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्ज नोंदणीस प्रारंभ  ​

सकाळवृत्तसेवा

पुणे : "म्हाडा'च्या माध्यमातून नागरिकांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केल्यामुळे "म्हाडा'च्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून, म्हाडाने कोणत्याही मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पाच हजार 647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी प्रारंभ करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास या वेळी उपस्थित होते. 
पवार म्हणाले, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सदनिका आणि भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किंमतीत मिळणार आहेत. राज्यातील सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : पुण्यात रानगव्याचा पुतळा उभारून पुणेकरांनी वाहिली श्रद्धांजली

कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा चांगला परिणाम दिसत असून, घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ झाली आहे. म्हा

डाने सर्वसामान्यांना परवडतील अशी पर्यावरणपूरक घरे निर्माण करावीत. त्यासाठी विविध प्रकल्प हाती घ्यावेत. म्हाडाच्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे मिळण्यासाठी नागरिकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक "म्हाडा'च्या पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले. तर, आभार मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी मानले. 

हे ही वाचा : इक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्यूटी आता एकसारखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT