पुणे

"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात येणार असून, पुढील तीन वर्षांत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाकडून ठेवण्यात आले आहे. 

राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर "म्हाळुंगे- माण' ही राज्यात पहिली नगररचना योजना विकसित केली जात आहे, असा दावा प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी बुधवारी केला. सध्या काही हजार वस्ती असलेल्या लोकसंख्येच्या या परिसरात दीड लाख लोकसंख्येला पुरेल एवढ्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात या योजनेतील रस्त्यांची निर्मिती केली जाणार असून, पुढील सहा महिन्यांत त्यांचे काम पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रस्ते, मैलापाणी वाहिन्या, वीजवाहिन्या यांचे जाळे उभारून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

हिंजवडीच्या तुलनेत म्हाळुंगे- माण परिसरातील नागरिकांसाठी आवश्‍यक हॉस्पिटल, शाळा, मैदाने, बस स्थानके अशा सुविधांची निर्मिती प्राधान्याने केली जाणार आहे. "मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये झालेल्या प्रदर्शनात या नगररचना योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा गुंतवणूक परिषद घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 

विकसित भूखंडांच्या लिलावातून निधी 
पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांचा विकासाकरिता प्राधिकरणातर्फे सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यातील विविध सुविधांची निर्मिती प्राधिकरणाला मिळणाऱ्या जागांच्या लिलावातून करण्यात येईल, असे गित्ते यांनी सांगितले. म्हाळुंगे- माण परिसरातील काही रस्त्यांची कामे प्राधिकरणाने यापूर्वीच सुरू केली आहेत, तर आता सर्व लहान- मोठ्या रस्त्यांसह इतर सुविधांच्या निर्मितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT