PMRDA 
पुणे

म्हाळुंगे-माणच्या टीपी स्कीममध्ये त्रुटी

सकाळवृत्तसेवा

पुणे - म्हाळुंगे-माण येथील नगर रचना योजनेवर (टीपी स्कीम) दाखल हरकती- सूचनांनुसार करण्यात आलेल्या बदलाचे नकाशे नाहीत, तसेच आरक्षणांसाठीच्या जागांना अरुंद रस्ते ठेवणे, प्लॉट विकसित होऊ शकणार नाहीत अशा पद्धतीने त्यांची रचना करणे, लॅण्डलॉक करणे अशा स्वरूपाच्या अनेक त्रुटी राहिल्या असल्याचे नगर रचना विभागाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) कळविले आहे. यावरून योजना करताना भूखंडांचे नियोजन व्यवस्थित झालेले नसल्याचे समोर आले आहे.

म्हाळुंगे-माण येथील टीपी स्कीम मंजूर केल्यानंतर पीएमआरडीएने ही योजना राज्य सरकारच्या नगर रचना विभागाकडे तपासणी आणि सल्लामसलतीसाठी पाठविली होती. त्यावर नगर रचना विभागाने आपला अहवाल पीएमआरडीएला नुकताच सादर केला आहे. त्या अहवालाची पत्र ‘सकाळ’कडे उपलब्ध झाली आहे. नगर रचना योजना करताना पीएमआरडीएकडून कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच ही नगर रचना योजना करताना त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचेही नमूद केले आहे.

नगर रचना योजनेचे प्रारूप जाहीर केल्यानंतर पीएमआरडीएने त्यावर नागरिकांकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. दाखल हरकती सूचनांनुसार नगर रचना योजनेत पीएमआरडीएकडून काही बदल करण्यात आले. हे बदल नकाशासह नगर रचना विभागाकडे तपासणीसाठी पाठविणे आवश्‍यक होते. मात्र, पीएमआरडीएने ते पाठविले नाहीत. त्यामुळे जे बदल करण्यात आले आहेत, ते कळत नसल्याचे नगर रचना विभागाने अहवालात म्हटले आहे. तपासणीमध्ये काही प्लॉटला रस्ता ठेवलेला नाही, आरक्षणांच्या जागांना जे रस्ते ठेवले आहेत, ते अतिशय अरुंद आहेत, खासगी मालकांना द्यावयाचे प्लॉट अरुंद आणि मोठ्या लांबीचे ठेवले आहेत, अशा प्रकारच्या अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नगर रचना विभागाने अहवालात नोंदविले आहे.

म्हाळुंगे-माण टीपी स्कीम करताना पीएमआरडीएने अनेक कायदेशीर तरतुदींचे पालन केलेले नाही. तसे, राज्य सरकारच्या नगर रचना विभागाने त्यांच्या अभिप्रायामध्येदेखील म्हटले आहे. त्यामुळे एकूण या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT