पुणे

म्हसवड पालिकेने दुकान गाळे स्थानिकांनाच द्यावेत -किशोर सोनवणे

CD

म्हसवडमधील गाळे लिलाव प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावे
म्हसवड, ता. ८ : येथील पालिका कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर व्यापारी संकुलाचे गाळे लिलाव करताना पालिका प्रशासनाने म्हसवड शहरातील स्थानिकांना व्यापारी संकुलाचे गाळे द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती.
निवेदनात म्हटले आहे, की म्हसवड पालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्यापारी गाळे व आरक्षण क्रमांक ९ मधील गाळ्यांचे वाटप फक्त म्हसवड नगरपालिका कार्यक्षेत्रातील व्यावसायिक व नागरिकांनाच देण्याचा ठराव सभेने मंजूर केला होता. मात्र, कायद्यानुसार या गाळे लिलाव प्रक्रियेत सर्वांना भाग घेता येतो. मात्र, पालिकेकडून केल्या जाणाऱ्या गाळ्यांच्या लिलावाबाबत स्थानिक रहिवासी असलेल्या लोकांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी श्री. सोनवणे यांनी केली होती; परंतु पालिकेच्या मालकीच्या मालमत्तेचा लिलाव हा महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५, लागू शासन निर्णय, नियम, अटी व शर्तीनुसार पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे डॉ. सचिन माने यांनी सांगितले.

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Bidkin News : अवैध प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

‘बीयर आणू का?’ वेटरच्या प्रश्नाने संतापले तुकाराम मुंढे; बॅग भरली अन् थेट दिल्ली सोडली, १९९६चा किस्सा सांगितला

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT