पुणे

सातारा जिल्ह्यात म्हसवड पोलीस ठाण्याची ऐतिहासिक कामगिरी जानेवारी 2026 मधील उत्कृष्ट कार्यासाठी चार मानाचे पुरस्कार

CD

म्हसवड पोलिस ठाण्याला चार पुरस्कार

जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी; अधीक्षकांच्या हस्ते गौरव

म्हसवड, ता. २३ : सातारा जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात म्हसवड पोलिस ठाणे जानेवारी २०२६ मध्ये केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. पोलिस ठाण्याला एकाच महिन्यात चार पुरस्कार मिळाले असून, पोलिस अधीक्षकांच्या हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
जनतेच्या हितासाठी, विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रभावी उपक्रमांमुळे पोलिस ठाण्याला पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मासिक क्राइम कॉन्फरन्समध्ये जनहितासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांचा सन्मान करण्यात येतो. जानेवारी २०२६ मध्ये म्हसवड पोलिस ठाण्याने या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत जिल्ह्यात आदर्श निर्माण केला.
या कालावधीत म्हसवड पोलिस ठाण्याने जिल्ह्यात सर्वाधिक शाळा व महाविद्यालयांना भेटी देत मुलींच्या सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती केली. छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या, तसेच एखादी अनुचित घटना घडल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. गुड टच, बॅड टच यांसारख्या संवेदनशील विषयांवर प्रभावी प्रबोधन, रोड रोमियोविरोधात कठोर कारवाई आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या ठोस उपायांमुळे सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासोबतच महिलांविरोधातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास अवघ्या २४ तासांत पूर्ण करून सर्व सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. नॉन बेलेबल वॉरंट प्रकरणांमध्येही तब्बल १५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार मिळाला. पीडित महिलेवर मारहाण व विनयभंगाच्या प्रकरणात तत्काळ तपास करून २४ तासांत चार्जशीट दाखल करण्याची तत्परता दाखवली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह भगवान सजगणे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, सतीश जाधव, विकास ओंबासे, कोमल काळेल आणि ज्योती सरगर यांनी कामगिरीत भूमिका बजावली.

---------------------------------

02387
सातारा : तुषार दोशी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना म्हसवड पोलिस ठाण्याचे अक्षय सोनवणे व पोलिस कर्मचारी. त्या वेळी डॉ. वैशाली कडुकर.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : धारावीतील परवाना नसलेल्या ठिकाणी औषध साठा जप्त

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT