पुणे

अल्पवयीन मुलाची धिंड प्रकरणी बुधवारी धरणे आंदोलने

CD

धिंडप्रकरणी म्हसवडला
बुधवारी धरणे आंदोलन

म्हसवड, ता. ७ : येथील पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलासह काही युवकांची धिंड काढल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी बुधवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता येथील अतिरिक्त तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भागवत अर्जुन जानकर व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिली.
म्हसवड पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करून काही युवकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात बनावट गुन्हा दाखल केला. त्यामध्ये अल्पवयीन मुलाचीही धिंड काढून बदनामी केल्याचा गंभीर गुन्हा केला आहे. ही घटनेने मानवी हक्कांचे, तसेच बाल न्याय अधिनियमाचे उल्लंघन झाले असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात अल्पवयीन मुलाच्या पालकांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार दिली असतानाही आजपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
संबंधितांवर गुन्हा दाखल होत नसल्याने न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, असे भागवत जानकर व महेश करचे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai News: इमारतीत प्रवेश नाकारला, दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं, महापालिकेवर धडक; नेमकं प्रकरण काय?

मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

Latest Marathi News Live Update: कन्नडच्या रस्ते आणि पुलासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर- आ. संजना जाधव

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

SCROLL FOR NEXT