म्हसवडकर स्टोअर्समध्ये ऑफर्समध्ये खरेदीची संधी
सातारा, ता. ९ : सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना केवळ आकर्षक किंमतच नव्हे, तर योग्य उत्पादनाची निवड, आर्थिक सुविधा आणि विक्रीनंतर मिळणारी सेवा यांनाही महत्त्व असते. ग्राहकांच्या याच गरजा लक्षात घेऊन म्हसवडकर स्टोअर्स येथे दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्ससह खरेदीची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन लॅपटॉप, डेस्कटॉप, रिफर्बिश्ड लॅपटॉप यांसह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहेत. ग्राहकांची गरज, वापर आणि बजेट लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कोणते उत्पादन योग्य ठरेल, याबाबत स्टोअर्समधील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, तसेच घरगुती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना योग्य पर्याय निवडणे सोपे होते.
दिवाळी सेलअंतर्गत यूपीआय पेमेंटवर आकर्षक सवलती, निवडक बँक कार्डवर कॅशबॅक, विनाव्याज व कमी व्याजदरातील हप्त्यांचे पर्याय, कमी डाउन पेमेंट, तसेच विविध भेटवस्तू उपलब्ध आहेत. ग्राहकांना एकरकमी आर्थिक भार न घेता आपल्या सोयीनुसार खरेदी करता यावी, यासाठी सुलभ आर्थिक पर्यायही देण्यात आले आहेत. याशिवाय वॉरंटी, अपघाती नुकसान संरक्षण आणि अँटीव्हायरससारख्या सुविधांचे पर्यायही उपलब्ध आहेत.
म्हसवडकर स्टोअर्सची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे विक्रीनंतरची सेवा. जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री आणि त्यानंतरची सेवा यासाठी विश्वासार्ह दुकान म्हणून स्टोअर्सने ग्राहकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. केवळ वस्तू विकण्यापुरते मर्यादित न राहता ग्राहकांना खरेदीनंतरही आवश्यक सहकार्य आणि सेवा देण्यावर भर दिला जातो.
लॅपटॉप, डेस्कटॉप आणि त्यांच्याशी संबंधित विविध उपकरणे, अॅक्सेसरीज, सॉफ्टवेअर, वॉरंटी आणि सर्व्हिस अशा अनेक सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने ग्राहकांसाठी म्हसवडकर स्टोअर्स हा सोयीचा पर्याय ठरत आहे. त्यामुळे या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना आकर्षक सवलतींसोबतच योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवांचा लाभ घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
म्हसवडकर स्टोअर्सची पहिली शाखा ५३८, गुरुवार पेठ, शेटे चौक, सातारा येथे, तर दुसरी शाखा शॉप क्रमांक १९, गौरीशंकर डायग्नोस्टिकजवळ, सातारा येथे आहे. अधिक माहितीसाठी ७७७००७७५५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
चौकट :
दिवाळी धमाका सेलमधील ऑफर्स
-------------
नवीन लॅपटॉप व डेस्कटॉपवर ९,००० रुपयांपर्यंत तत्काळ यूपीआय सवलत.
निवडक बँक कार्डवर २०,००० रुपयापर्यंत कॅशबॅक.
१२ महिन्यांपर्यंत विनाव्याज हप्ते; २४ महिन्यांपर्यंत कमी व्याजदरात हप्ते.
९९ रुपयापासून अपघाती नुकसान संरक्षण.
२,९९९ रुपयापासून तीन वर्षांची वॉरंटी, अपघाती नुकसान संरक्षण व अँटीव्हायरस पॅकेज.
रिफर्बिश्ड लॅपटॉप २०,००० रुपयांपासून; पात्र लॅपटॉपवर तीन वर्षांची वॉरंटी.
रिफर्बिश्ड लॅपटॉपवर यूपीआय पेमेंटसाठी १,५०० रुपयापर्यंत सवलत.
वायरलेस हेडफोन ४९९, कीबोर्ड-माऊस संच ७९९, ट्रॉली बॅग ९९९ रुपयापासून.
बजाज फायनान्सच्या माध्यमातून खरेदीवर ७,७७७ बक्षिसांची लकी ड्रॉ योजना.
बंपर बक्षिसे : महिंद्रा थार, सहा अल्टो कार, १६ ॲक्टिव्हा, १३४ ई-स्कूटर, ४०२ सायकली, तसेच सोन्या-चांदीची नाणी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन व स्मार्टफोन जिंकण्याची संधी.
पत्ता : १) ५३८, गुरुवार पेठ, शेटे चौक, सातारा. २) शॉप क्र. १९, गौरीशंकर डायग्नोस्टिकजवळ, सातारा.
फोटो ओळी :
सातारा : ऑफर्समध्ये खरेदी केलेला लॅपटॉप ग्राहकास वितरित करताना रोहन शहा.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.