सूक्ष्म सिंचनासाठी दोन कोटींचा निधी
कृषीची प्रति थेंब अधिक पीक योजना ः एससी, एसटी शेतकऱ्यांनी अर्ज करावे
अहिल्यानगर, ता.३० ः जिल्ह्यांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी सूक्ष्म सिंचनाच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक राबविण्यात येत आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ कोटी ६६ लाख रकमेचा व अनुसूचित जमातीकरिता ४३.६६ लाखांचा निधी जिल्हास्तरावर प्राप्त झालेला आहे. या योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन घटकांचा म्हणजेच ठिबक व तुषार सिंचनचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत प्रति थेंब अधिक पिकाअंतर्गत यंदाचे वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाचा अनुदान निधी मंजूर आहे. या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानाची तरतूद आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरणे अपेक्षित आहे. ज्याद्वारे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला कमाल पाच हेक्टर क्षेत्र मर्यादित दिला जातो. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी https:///mahadbt.maharashtra.gov.in/farmer/ agrilogin या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------
अशी होणार निवड
लाभार्थींची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वानुसार करण्यात येईल. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी हा ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सामूहिक सेवा केंद्र, कृषी विभागाचे अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे बोराळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.