पुणे

हॉटेल, घरातून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

CD

कळस, ता. ५ : रुई (ता. इंदापूर) येथील सौंदर्य हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला व गल्ल्यातील २० हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल फोन लंपास केला. यानंतर हॉटेलपासून सुमारे एक हजार फूट अंतरावर असलेल्या हॉटेल मालकाच्या घरात मागील बाजूच्या दाराने प्रवेश केला कपाटातील ९० हजार रुपये रोख रक्कम, दोन तोळे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली.
दोन आठवड्यांपूर्वीच परिसरात चोरीची मोठी घटना घडली होती. यानंतर काल मध्यरात्री झालेल्या चोरीच्या या घटनेने सणासुदीच्या काळात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुई येथील सौंदर्य हॉटेलचे मालक शहाजी पांडुरंग मारकड यांनी चोरीच्या घटनेची वालचंदनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी गल्ल्यातील वीस हजार रुपयांची रोख रक्कम व एक मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला. यावेळी इतर चोरटे हॉटेलमध्ये धुंडाळा घेत असताना, एक चोरटा मात्र मजेत नाचत असल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसून येत आहे. हॉटेलमधील चोरीनंतर या चोरट्यांनी हॉटेलपासून सुमारे एक हजार फूट अंतरावर असलेल्या मारकड यांच्या घरात पाठीमागील बाजूच्या दाराने प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली ९० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे गंठण, बोरमाळ, कर्णफुले असे सुमारे दोन तोळे सोने, एक घड्याळ व दारात लावलेल्या दोन मोटारसायकली घेऊन चोरांनी तेथून पोबारा केला. यापैकी एक मोटरसायकल सुरू न झाल्याने, घरापासून ३०० ते ४०० फूट अंतरावर सोडून दिली. तर दुसरी मोटरसायकल घेऊन चोरटे येथून पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री, अभिनेत्यासह तिघांना अटक; आधी डॉक्टरला घरी बोलावले, नंतर...

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT