पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून (ता.१४) लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार असली तरी, यामधून दूध वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरात लॉकडाऊन कालावधीतही दूध पुरवठा सुरळीतपणे सुरू राहिल, असे शहराला दूध पुरवठा करणाऱ्या विविध दूध संघांनी आज (ता.१३) सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) कामकाज नियमितपणे सुरू राहील. लॉकडाउनमधील नियमांचे पालन करत, शेतकऱ्यांकडील दूध घेण्यात येईल. सकाळच्या वेळेत किरकोळ विक्री केल्यानंतर ठोक विक्रेत्यांना किरकोळ विक्रीसाठी दूध उपलब्ध करुन दिले जाईल. शिवाय सोसायट्यांनी मागणी केल्यास, मागणीनुसार थेट सोसायट्यांमध्ये दूध पुरवठा करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल, असे कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले.
पुणेकरांना नेहमीप्रमाणेच लॉकडाउनमध्येही चितळे दूध उपलब्ध होईल. त्यामुळे शहरात चितळे दुधाचा तुटवडा जाणवणार नाही, असे चितळे डेअरीचे भागीदार गिरीश चितळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.