पुणे

‘मिल्की मिस्ट’चा आयपीओ ११ ऑगस्टपासून खुला

CD

‘मिल्की मिस्ट’चा आयपीओ
११ ऑगस्टपासून खुला

मुंबई, ता. ७ः मिल्की मिस्ट डेअरी फूड लि.चा आयपीओ मंगळवारपासून (ता.११) खुला होणार असून, तो गुरुवारी (ता. १३) बंद होईल. अँकर गुंतवणूकदार सोमवारी (ता.१०) बोली लावतील. गुंतवणूकदारांना किमान १०७ शेअरसाठी आणि त्यानंतर १०७ शेअरच्या पटीत बोली लावता येणार आहे. या आयपीओसाठी प्रतिशेअर १३३ ते १४० रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ १,५५३ कोटी रुपयांचा असून,दोन रुपये दर्शनी मूल्याच्या नव्या शेअरच्या विक्रीतून १,४२८ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत, तसेच, १२५ कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत सतीशकुमार टी हे ७५ कोटी रुपायंचे, तर अनिता एस या ५० कोटी रुपयांचे शेअर विकणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी राखीव भागातून अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर १३ रुपये सवलत देण्यात येणार आहे. या शेअरची नोंदणी बीएसई आणि एनएसईवर करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT