फग्युर्सन महाविद्यालय ः मैदानावर सुरू असलेल्या चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत सनब्राइट प्रशालेविरुद्धच्या लढतीत नाबाद अर्धशतकी खेळी करणारा मिलेनियम प्रशालेचा आरीन सातपुते सुरेख फटका मारताना.
------------
मिलेनियम, सिंबायोसिस, बाल शिक्षण मंदिर प्रशालेची प्रतिस्पर्ध्यांवर मात
शालेय क्रिकेट स्पर्धा
पुणे, ता. २२ ः शिक्षण विभाग पुणे मनपा आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या शालेय क्रिकेट स्पर्धेत
मिलेनियम, सिंबायोसिस प्रायमरी, बाल शिक्षण मंदिर प्रशाला, नालंद गुरुकुल प्रशालेने आपापल्या प्रतिस्पर्धांवर विजय मिळविले.
फग्युर्सन महाविद्यालय आणी कॅम्प येथील आझम कॅम्पसच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आरीन सातपुतेने केलेल्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर मिलेनियम स्कूलने सनब्राइट प्रशालेचा ६० धावांनी पराभव केला. अन्य लढतीत सिंबायोसिस प्रायमरी स्कूलने टिळक रोडच्या एस.पी. एम. इंग्रजी माध्यम प्रशालेवर सहा धावांनी, तर बाल शिक्षण मंदिर प्रशालेने हडपसरच्या सिग्नेट जे.एस.पी.एम. प्रशालेवर नऊ गडी राखून विजय मिळविला, तसेच नालंद गुरुकुल प्रशालेने क्रिमसन अतिषा ग्लोबल स्कूलचा नऊ धावांनी पराभव केला.
संक्षिप्त धावफलक ः
१) मिलेनियम स्कूल, कर्वेनगर - (६ षटकांत) १ बाद ८७ आरीन सातपुते नाबाद ६३, संस्कार ढेपे १-८) विजयी विरुद्ध सनब्राइट प्रशाला, नऱ्हे, आंबेगाव - (६ षटकांत) ५ बाद २७ (अर्णव पाटील ११, विहान धुमवाड १-१, कैवल्य कोंडे १-२)
२) सिंबायोसिस प्रायमरी स्कूल - (६ षटकांत) २ बाद ६३ (रुद्रांक्ष बडवे १९, पृथ्वीराज सुतार नाबाद १२, ईशान देशपांडे १-६) विजयी विरुद्ध एस.पी. एम. इंग्रजी माध्यम प्रशाला, टिळक रोड - (६ षटकांत) ३ बाद ५७ अभिजित खैरे १-१९)
३) सिग्नेट जे.एस.पी.एम. हडपसर - (६ षटकांत) ८ बाद ३१ (अमन शेख १५, युग जाधव ३-७, मृगांग जोशी २-७) पराभूत विरुद्ध बाल शिक्षण मंदिर प्रशाला- मयूर कॉलनी - (३.२ षटकांत) १ बाद ३२ (ओजस सुर्वे नाबाद १०)
४) नालंद गुरुकुल प्रशाला - (६ षटकांत) १ बाद ५६ (प्रथमेश गायकवाड नाबाद २७, ओंकार मोरे १९, अतिष्क प्रसाद १-११) विजयी विरुद्ध क्रिमसन अतिषा ग्लोबल स्कूल - (६ षटकांत) २ बाद ४७ (आयुद सूर्यवंशी १-८, ओंकार मोरे १-११)
-----------
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.