Bhimashankar-Temple Sakal
पुणे

भिमाशंकर : लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभुमी व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

भिमाशंकरला लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभुमी व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले.

Millions of devotees flock to Bhimashankar

शिनोली : हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकरला लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. आज दुस-या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभुमी व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले. परंतु भाविक मात्र श्रावण महिना चालू झाल्यापासून भिमाशंकरला गर्दी करत आहे.

बारा ज्योतिर्लींगापैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असणारे भीमाशंकर मंदिर कोरोनामुळे बंद असल्याने दुस-या श्रावणी सोमवारी मोजक्या सेवा गुरव पुजारी यांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला. श्रावण महिना चालू झाल्यापासून बहुतेक भाविक भीमाशंकर परीसरातील हॉटेल, लॉजवर मुक्कामी येत आहे. अन् दुस-या दिवशी सकाळी पहाटे दर्शनासाठी जात आहे. डिंभे, पालखेवाडी येथे भाविक, पर्यटक यांनी भीमाशंकरला जाऊ नये यासाठी 24 तास पोलीस प्रशासन सज्ज आहे. तरीपण भाविक महादेवाच्या दर्शनाला भीमाशंकरमध्ये जात होते. डिंभे धरण, कोंढवळ, आहुपे, भीमाशंकर परीसर येथे वर्षाविहार करण्यासाठी पर्यटक जात आहे.

पालखेवाडी चेकपोस्टवर ज्या हॉटेल व्यावसायिकांची प्रशासनाबरोबर ओळख त्याच भाविकांची गाडी भिमाशंकरला सोडली जात आहे. अन् ज्यांची ओळख नाही ते बाजुला गाडी पार्कीग करून भीमाशंकरला पायी किंवा पुढे उभ्या असलेल्या खाजगी वाहनाने जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT