PMP Midi Bus Sakal
पुणे

मिनी नको, मिडी बस घ्या

पीएमपी ७ मीटरच्या ३०० बस घेण्याच्या तयारीत आहे. मात्र मिनी बस घेण्यापेक्षा त्याहून मोठी असलेली ९ मीटर ची मिडी बस घेणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पीएमपी ७ मीटरच्या ३०० बस घेण्याच्या तयारीत आहे. मात्र मिनी बस घेण्यापेक्षा त्याहून मोठी असलेली ९ मीटर ची मिडी बस घेणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे.

पुणे - पीएमपी ७ मीटरच्या ३०० बस घेण्याच्या तयारीत आहे. मात्र मिनी बस घेण्यापेक्षा त्याहून मोठी असलेली ९ मीटर ची मिडी बस घेणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. तेव्हा मिडी बस घ्यावे. तसेच बाजीराव रस्त्यावरून धावणाऱ्या मोठया बसचे ४ केवळ चार मार्ग सुरु करण्यात आले आहे. उर्वरित ६ मार्गही सुरु करणे होणे गरजेचे आहे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पीएमपीच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पीएमपी प्रशासन एखाद्या कंपनीचा हिताचा विचार करून काही निर्णय घेत आहे. यातच कॅब सेवा सुरु करण्याच्या मागे देखील काही लोकांचे स्वार्थ आहे. पीएमपी सक्षम होण्यासाठी तोट्यात असणारे मार्ग बंद करणे गरजेचे आहे. यामुळे डिझेल व सीएनजी वर होणाऱ्या खर्चात बचत होईल. हे करीत असताना नफ्यात असणाऱ्या मार्गावर अधिक चांगली सेवा दिली पाहिजे.

पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करावा. पुणे शहर व उपनगरात बस सेवा अपूर्ण आहे. यासाठी लांब पल्याचे मार्ग बंद करावेत. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी तिकीट दर कमी असावा. बीआरटीचे फसलेले नियोजन सुधारणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे,पासेसचे दर कमी करावेत, असेही त्यांनी पीएमपीच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT