पुणे

विडी कारखानदार संघर्ष

CD

वेतनवाढीने विडी उद्योग स्थलांतराची भीती
कारखानदारांचा विरोध; वाढीव वेतन अन् फरकाची रक्कम देणे जिकिरीचे

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : विडी कामगारांच्या नव्या किमान वेतनाच्या निर्णयास विडी कारखानदारांनी विरोध दर्शविला आहे. देशातील अन्य १४ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा वेतन दिले जात आहे. उद्योग कमी वेतन असलेल्या राज्यांत स्थलांतरित होण्याची भीती कारखानदारांनी व्यक्त केली आहे.
२०१४ पासून विडी कामगारांच्या किमान वेतनाचा लढा विविध टप्प्यांत सुरू होता. ही प्रक्रिया अनेक वर्षे पुढे गेल्यानंतर राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी कारखानदारांचे प्रतिनिधी व कामगारांशी चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला. त्यानुसार आता २१० रुपये किमान वेतन आणि १६९ रुपये महागाई भत्ता, असे एकूण ३७९ रुपये प्रतिहजार विडी वेतन निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विडी कारखानदारांची पुण्यात दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यात शासनाच्या निर्णयावर चर्चा केली जाणार आहे.
देशात सर्वाधिक वेतन महाराष्ट्रात दिले जात आहे. त्याखालोखाल तेलंगणात २३४ रुपये वेतन दिले जाते. आतापर्यंत स्थानिक कारखानदार कामगारांना २४५ रुपये वेतन देत होते. हे वेतन तेलंगणापेक्षा अधिक आहे. त्यात अचानक १३४ रुपयांची वाढ करून फरकाची रक्कम देणे जिकिरीचे असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.
कामगारांचे वेतन वाढल्यास विडीची किंमत वाढते. विडीच्या किमतीपैकी ५५ टक्के हिस्सा मजुरीचा आहे. त्यातच पश्‍चिम बंगालमध्ये १८ टक्के जीएसटीची करचुकवेगिरी करून विडी कमी दराने विकली जाते. त्यामुळे स्वस्त विडी विकणाऱ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते. या परिस्थितीत विडी उद्योग टिकावा आणि कामगारांचा रोजगार कायम राहावा, या भूमिकेतूनच २४५ रुपयांपर्यंत वेतन दिले आहे, असा दावा कारखानदारांनी केला आहे.
----------------------------
कामगार संघटनांच्या दुराग्रही भूमिकेमुळे यापूर्वी कापड गिरण्या, सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. तशीच स्थिती निर्माण होऊन विडी उद्योगही बंद पडल्याशिवाय राहणार नाही. विडी उद्योजक थेट अन्य राज्यांत कमी मजुरी देऊन कारखाने चालवतील. राज्यातील विडी कारखानदार संघटनेची दोन दिवसांत बैठक होऊन पुढील निर्णय घेतले जातील.
- बाळासाहेब जगदाळे, प्रवक्ते, सोलापूर विडी उद्योग संघ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : संतप्त जमावाच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू ;शहरात पुन्हा झुंडबळी; चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने संताप

Manwat Farmers: घरातील साहित्य विकले, शेती गहाण ठेवली; थकीत बिलांसाठी मानवतमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

प्रदीप पूर्णेकरांच्या घरी Jayant Patil दाखल! नेमकं काय म्हणाले?

MPSC protest Pune : पुण्यातील MPSC आंदोलनावर हायकोर्टाने सरकारला खडसावलं; 'विद्यार्थी समाजविघातक नाही...'

Dharashiv Sugarcane Farmers : ‘ऊसदराच्या बाबतीत उत्तर द्या’, ओमराजे, तानाजी सावंतांसह आमदार, खासदारांना थेट इशारा, धाराशिवचे शेतकरी संतप्त

SCROLL FOR NEXT