ajit pawar sakal
पुणे

Ajit Pawar : समाविष्ट गावांमधील थकबाकी वसुली थांबवा ; पालकमंत्री अजित पवारांचा आयुक्तांना आदेश

समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे. थकबाकी सक्तीने वसूल केली जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईपर्यंत महापालिकेने थकबाकी वसुली थांबवावी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे. थकबाकी सक्तीने वसूल केली जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईपर्यंत महापालिकेने थकबाकी वसुली थांबवावी, असा आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ३) महापालिका प्रशासनाला दिला.

समाविष्ट गावांमधील नागरिकांना मिळकतकर व दंडापोटीची रक्कम जादा आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच अतिक्रमण कारवाईदेखील केली जात आहे. यामुळे ३४ गावांमधील नागरिक व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

मिळकतकर थकबाकी, अतिक्रमण कारवाई, पाणी प्रश्न अशा विविध समस्यांचा नागरिकांनी पाढा वाचला. त्यावर पवार म्हणाले, ‘‘समाविष्ट गावांसह थकबाकीदार नागरिकांकडून सक्तीने मिळकतकर वसूल करणे, मालमत्ता जप्तीच्या तक्रारी नागरिक करत आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत आमची बैठक होईल. त्यात धोरणात्मक निर्णय घेतला जाईपर्यंत आयुक्तांनी कारवाई थांबवावी.’’ यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

‘उंड्रीला टॅंकरने पाणी द्या’

उंड्रीतील सिल्वर हिल्स सोसायटीतील रहिवासी सचिन गावडे व जयश्री पुणेकर यांनी पाण्याची समस्या मांडली. त्यावर उंड्रीला टॅंकरने पाणीपुरवठा करा, लोकांना पुरेसे पाणी द्या, अशी सूचना पवार यांनी आयुक्तांना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT