accident sakal media
पुणे

दुचाकीची झाडाला धडक बसल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू

दुचाकीची रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

येरवडा - शास्त्रीनगर येथील मातृछाया सोसायटी जवळ दुचाकीची रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ऋतिक पंडित सोनवणे (वय १५, रा. वैकफिल्ड वस्ती, रामवाडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून महेश चंपालाल जहांगिर (वय १७)असे जखमी मुलाचे नाव आहे.

महेश त्याच्या आईचा लॅबमधील रिपोर्ट घेण्यासाठी दुचाकीवरून शास्त्रीनगरकडे जात होता. त्याच वेळी त्याचा मित्र ऋतिक मागे बसला होता. दरम्यान दुचाकी मातृछाया सोसायटीच्या जवळ आल्यानंतर येथील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाला धडक बसली. यामध्ये ऋतिकचा जागेवर मृत्यू झाला. तर महेश जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख म्हणाले, ‘दुचाकीचालक अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT