shirur accident 
पुणे

Pune News: पुण्यातील अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले, शिरुरच्या अरणगावमधील घटना

Minor crushes bike rider: अल्पवयीन मुलगी पीकअप चालवत होती. तिने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

Pune News: पोलीस पाटलाच्या एका अल्पवयीन मुलीने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील ही घटना आहे. अल्पवयीन मुलगी पीकअप चालवत होती. तिने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सध्या पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघाताचे प्रकरण चांगलेच गाजत आहेत. त्यातच आता शिरुरच्या अरणगाव येथे ही घटना घडल्याने याची चर्चा होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अरुण मेमाणे या तरुणाला चिरडले आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलगी गाडी चालवत असताना वडील पोलीस पाटील संतोष लेंडे हे बाजूलाच बसले होते. लेंढे कुटुंबीय मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होते. यावेळी गाडीमध्ये आई-वडील, मुलगा आणि मुलगी होते. त्यावेळी मुलीला गाडी चालवण्यात देण्यात आली होती. तिने रस्त्यावरील दुचाकीस्वाराला धडक दिली. तिने तरुणाला ४० ते ५० मीटर फरफटत नेले असल्याची माहिती आहे. यात आणखी एक तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

जखमी तरुणाचे नाव महिंद्र बांडे असल्याचं कळतंय. तो गंभीर जखमी आहे. अपघात अरणगावच्या शिवारात घडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकरी घटनास्थळी गोळा झाले होते. जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर घटनेमुळे खळबळ उडाली असून शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT