minor girl assaulted by threatening to make photo viral social media crime police Sakal
पुणे

Wagholi Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

इंस्टाग्रामवरील मुला बरोबर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : इंस्टाग्रामवरील मुला बरोबर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली. त्याने ओळखीचा फायदा घेत तिचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्या मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाणे अंतर्गत 15 दिवसात तीन पोक्सो गुन्ह्याची नोंद झाली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही शिक्षण घेतात. इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. यानंतर त्याने मुलीला आपल्या जाळ्यात ओढत भेटण्यास बोलवले. संधीचा फायदा घेत तिचे फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हा धक्कादायक प्रकार लोणीकंद परिसरात सात मार्च ते चार एप्रिल दरम्यान घडला. चार एप्रिल रोजी त्याने पीडित तरुणीला जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसवून खराडी भागातील आयटी पार्क येथील मोकळ्या मैदानात नेले.

त्याठिकणी गाडीमध्ये तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन तिचे अश्लील फोटो काढले. अखेर पीडित मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन अभि कांबळे याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

१५ दिवसात दाखल झालेले गुन्हे

२५ एप्रिल - नामांकित शाळेत अत्यवयीन मुलावर कर्मचाऱ्याचा लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न

1 मे - १७ वर्षीय मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार, आईसह तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT