Crime News esakal
पुणे

Pune Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आईला मारहाण

हडपसर परिसरातील भाजीपाला मार्केटमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एका तरुणाने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढून तिचा विनयभंग केला. तसेच, याबाबत जाब विचारणाऱ्या आईला त्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील भाजीपाला मार्केटमध्ये घडली.

या प्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून लक्या पाटील (वय २२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा भेकराईनगर येथील भाजीपाला मार्केटलगत भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी महिलेची १४ वर्षांची मुलगी शाळा सुटल्यानंतर आईला भाजीपाला विक्रीस मदत करते. आरोपी लक्या पाटील हा बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आला. त्याने त्या मुलीचा जबरदस्तीने हात ओढून विनयभंग केला. याबाबत मुलीच्या आईने त्याला जाब विचारला. त्यावेळी लक्याने त्या महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT