पुणे

अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांकडून बलात्कार

CD

पारगाव, ता. ९ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. तसेच, या आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो दुसऱ्याला दिला व त्यांनी तो त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास व कुणाल कैलास बोऱ्हाडे आणि दोन अल्पवयीन मुलांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, या आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला. त्यानंतर महेश याने तो त्यातील एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT