misconduct against obc leader laxamn Hake demand strict action against culprits pune sakal
पुणे

Laxman Hake : हाके यांच्यावरील गैरप्रकाराचा निषेध दोषींवर कठोर कारवाईची मागणी

सकल ओबीसी व धनगर समाजाच्या वतीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबतीत झालेल्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कात्रज-कोंढवा रस्ता येथे आंदोलन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : सकल ओबीसी व धनगर समाजाच्या वतीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबतीत झालेल्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कात्रज-कोंढवा रस्ता येथे आंदोलन करण्यात आले.

हाके यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाणून-बुजून त्यांच्यावर पाळत ठेवून घेराव घालत. त्यांनी दारू पिले असे खोटे आरोप करून त्यांची बदनामी करणारे चुकीचे व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल केले असल्याचे म्हणत ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.

रुग्णालय तपासणीमध्ये हे निदर्शनास आलेले आहे की, त्यांनी कोणतीही मद्य प्राशन केलेले नाही. तरी लक्ष्मण हाके यांच्या यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या पोलीस संरक्षणात तात्काळ वाढ करण्यात यावी तसेच ज्या समाजकंटकांनी हा प्रकार केला त्यांच्यावरती ३०७सारखे गुन्हे तात्काळ गुन्हे दाखल करावेत.

राज्य सरकारने याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन धनगर समाजातर्फे उभारले जाईल आणि त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील असे घनश्याम हाके यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना देण्यात आले. यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT