Representational image of PMPML 
पुणे

खासगी वाहने आत अन्‌ बस स्थानकाबाहेर

सकाळवृत्तसेवा

पुणे : खासगी वाहने स्थानकामध्ये; तर बस स्थानकाबाहेर... बसची वाट पाहत ताटकळत थांबलेले प्रवासी... अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नियोजनाचा उडालेला बोजवारा... असे चित्र कात्रजमधील पीएमपी बस स्थानकात पाहावयास मिळत आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

या स्थानकातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या विविध भागांत बस सोडल्या जातात. या ठिकाणी प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. मात्र सध्या या स्थानकाचे नियोजन कोलमडले आहे. स्थानकाच्या परिसरात खासगी वाहने उभी केली जातात; तसेच वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली वाहनेही या ठिकाणी आणून उभी केली जात आहेत.

यामुळे स्थानकात बस उभ्या करण्यासाठी जागा राहात नसल्याने त्या सातारा रस्त्यालगत उभ्या केल्या जात असल्याने या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुणाचाही धाक उरला नसल्याने पीएमपी सेवेत बेजबाबदारपणा वाढल्याचे प्रवासी बोलून दाखवत आहेत. 

स्थानकाच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. बसबाबत माहिती विचारल्यावर ती दिली जात नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या स्थानकाकडे दुर्लक्ष होत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत आगारप्रमुख रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मी मीटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले. 

मार्ग क्रमांक 43... 
कात्रत्र-निगडी बायपास (क्र.43) मार्गावर प्रवाशांना चालक व वाहकांची मनमानी सहन करावी लागते. या मार्गावर नवले पूल ते कात्रजदरम्यानच्या काही थांब्यांवर बस थांबविली जात नाही. प्रवाशांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करूनही सुधारणा होत नाही; तसेच प्रशासनाचे या मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

ऐन सणासुदीमध्ये कात्रज स्थानकाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. याकडे आगारप्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कुणाचाही धाक राहिला नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
- रवींद्र कोंढाळकर, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT