पुणे

घाटातील कोंडीपासून सुटका; पर्यटन-व्यवसायालाही चालना

CD

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प एक मेपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे लोणावळा आणि खंडाळा परिसरातील नागरिकांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. तसेच पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, खाद्यपदार्थ व्यवसाय आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

बोरघाटात सतत वाहतूक कोंडी, अपघात, दरड कोसळणे आणि संथ वाहतुकीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झालेल्यांसाठी हा नवा रस्ता फायद्याचा ठरणार आहे. द्रुतगती मार्गावर खोपोली ते कुसगावदरम्यानचा घाट विभाग हा धोकादायक मानला जातो. तीव्र उतार, नागमोडी वळणे आणि वारंवार अपघात यामुळे या भागाला ‘डेंजर झोन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यावर ‘मिसिंग लिंक’मुळे प्रकल्प उपाय ठरू शकतो. सुट्टीच्या दिवशी, विशेषतः शनिवार-रविवार आणि पावसाळ्यात लोणावळा शहरात वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच द्रुतगती मार्गावर खोळंबा झाल्यास अनेक वाहने लोणावळा शहरातून पर्यायी मार्ग शोधत जातात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर ताण निर्माण होतो. खोपोली ते लोणावळा मार्गावर स्थानिकांनाही त्रास होतो. पण, आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर घाटातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. तसेच मुंबई आणि पुण्यातून पर्यटक कमी वेळेत लोणावळ्यात पोहोचू शकणार आहेत.

स्थानिकांना होणारे फायदे
- वाहतूक कोंडीतून सुटका व वेळेची बचत होणार
- ​खोपोली ते लोणावळा प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल
- ​दरडींसारख्या सारख्या नैसर्गिक आपत्तींपासून सुटका
- ​आर्थिक आणि पर्यटन विकास व पर्यटनाला गती
- ​स्थानिक व्यवसायास चालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

SCROLL FOR NEXT