पुणे

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह पिंपळवंडीत आढळला

CD

आळेफाटा, ता. १८ : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह मंगळवारी (ता. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास ओढ्याकाठी आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते.
अधिक माहितीनुसार, पिंपळवंडी येथील ही मुलगी मंगळवारी दुपारी चार वाजेपासून बेपत्ता होती. तिच्या घरच्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, लेंडेस्थळ येथील ओढ्याच्या कडेला झाडाझुडपात तिचा मृतदेह सापडला. दरम्यान, या मृत्यूमागे काही घातपात आहे का?, यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास जाधव पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Kolhapur DCC Bank Election : गोकुळपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी; 732 ठराव रद्द, कोणत्या गटात किती मतदार?

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

SCROLL FOR NEXT