लोणी काळभोर, ता. २४ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका नर्सरीतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी (ता. २२) सकाळी तिच्या बहिणीसोबत नर्सरीमध्ये कामाला गेली होती. पाऊस सुरू झाल्याने ती काही वेळ खोलीत थांबली, मात्र त्यानंतर ती कामावर परतली नाही. ‘ऑनलाइन पार्सल आणायला जाते’ असे सांगून ती नर्सरीतून बाहेर पडली, ती पुन्हा परतलीच नाही. तिचा मोबाईलही बंद असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. बेपत्ता मुलगी साडेचार फूट उंचीची, गोऱ्या रंगाची व सडपातळ बांध्याची आहे. तिने लाल रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची लेगिंग परिधान केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.