पुणे

"लाइफलाइन' पोलिसांच्या रडारवर;तरुणीचा शोध न लागल्याने कामाची तपासणी सुरू 

सकाळवृत्तसेवा

पुणे - जम्बो कोविड सेंटरचे जुने व्यवस्थापन असलेली "लाइफलाइन' एजन्सी आता पोलिसांच्या रडारवर असून, उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा महिनाभरानंतरही शोध न लागल्याने पोलिसांनी "लाइफलाइन'च्या कामाची तपासणी सुरू केली आहे. या तरुणीची नोंद कुठेच सापडत नसल्याचे गुरुवारी उघड झाले. तरुणी उपचारासाठी दाखल झाली होती का, तिच्यावर उपचार केले गेले का, त्यानंतर तिला घरी कधी सोडले, नसेल; तर ती कुठे गेली ? अशा प्रश्‍नांच्या चक्रव्यूहात महापालिका आणि पोलिस अडकले आहेत. 

29 ऑगस्टला दाखल झालेल्या तरुणीची माहिती देण्याबाबत महापालिकेने "लाइफलाइन'ला पत्र पाठवले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणताही खुलासा आलेला नाही. ही घटना "लाइफलाइन'ची नेमणूक असताना झाल्याचे सांगत, त्या काळातील चौकशी करावी, अशी मागणीही महापालिकेनेही पोलिसांकडे केली आहे. . 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"जम्बो'त उपचारासाठी गेलेली प्रिया गायकवाड ही तरुणी उपचारादरम्यान बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केली आहे. मात्र, आता महिना होत आला तरीही, तिचा शोध लागत नसल्याने तिच्या नातेवाइकांनी गुरुवारी "जम्बो'च्या परिसरात उपोषण सुरू केले आहे. त्यावरून पोलिसांनी व्यवस्थापनाच्या एजन्सींची चौकशी सुरू केली आहे. 

"जम्बो'त उपचारासाठी दाखल झालेल्या आणि त्यानंतर बेपत्ता असलेल्या तरुणीची सविस्तर माहिती "लाइफलाइन'कडून मागविली आहे. यासंदर्भात पोलिस चौकशीला सर्व सहकार्य केले जाणार असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. 
-रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT