पुणे

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ''एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

CD

फोटोओळ : PDR26B10077
पंढरपूर : जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलेला एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा संघ.

एमआयटी ज्युनिअर कॉलेज बास्केटबॉलमध्ये उपविजेते
जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांच्या संघाची कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा
पंढरपूर : वाखरी येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या संघाने १९ वर्षांखालील शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सांगोला येथील विद्यामंदिरमध्ये ही स्पर्धा झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, सांगोला बास्केटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एमआयटीच्या संघाने सांघिक कौशल्य आणि उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या सामन्यांनंतर संघाला उपविजेतेपद मिळाले. संघात कर्णधार तन्मय उद्धव होले, उपकर्णधार प्रशांत हणमंत खरात, कार्तिक कदम, धीरज कदम, उदय खरात, प्रणव जठार, ओम खटकाळे, अबूबकर नदाफ, मोहित कांबळे, तनिष्क देशमाने, राजवीर बोरसुरे आणि प्रतीक गायकवाड यांचा समावेश होता. क्रीडा शिक्षक प्रविण पिसाळ यांनी संघाला मार्गदर्शन केले. या यशाबद्दल हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT