pune sakal
पुणे

एमआयटी : ‘अकरावी भारतीय छात्र संसद’ २३ सप्टेंबरपासून होणार सुरू

उदघाटनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने ‘अकराव्या भारतीय छात्र संसदे’चे आयोजन २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता होईल, असे ‘एमआयटी’चे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हर्सिटीज आणि युनेस्को यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. तर ‘छात्र संसदे’च्या समारोपप्रसंगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया हे उपस्थित असणार आहेत.

‘छात्र संसदे’मध्ये यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी, केरळ विधानसभेचे सभापती एम. बी. राजेश, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य संशोधक सोमय्या स्वामिनाथन यांसह राष्ट्रीय पातळीवरील मान्यवर संवाद साधणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘www.bhartiyachhatrasansad.org’ नोंदणी करावी, असे आवाहन एमआयटीतर्फे करण्यात आले आहे.

‘छात्र संसदे’च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’चे प्रभारी कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, भारतीय छात्र संसदचे समन्वयक रवींद्रनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT