पुणे

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात ''विश्वारंभ'' समारंभ उत्साहात

CD

PNE26W44315
सोलापूर : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये आयोजित ‘विश्वारंभ २०२६’ या इंडक्शन समारंभाच्या उद्‌घाटनप्रसंगी राजेश दमाणी, कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी आदी.

जिज्ञासू अन्‌ नम्र राहून सतत शिकत राहा
राजेश दमाणी : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात ‘विश्वारंभ’ समारंभ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ ः आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संस्कारांची मुळे घट्ट असणे आणि स्वप्नांना पंख देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची वृत्ती जिवंत असेपर्यंत कोणीही प्रगती रोखू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू आणि नम्र राहून सतत शिकत राहावे, असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती व जामश्री रियल्टीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी यांनी केले.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये नवप्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘विश्वारंभ २०२६’ या इंडक्शन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी दमाणी यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकांवर भर देण्याचा, चुकांमधून शिकण्याचा आणि स्क्रीन टाइम कमी करून वाचन वाढवण्याचा मोलाचा सल्ला दिला.
कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणांच्या मागे न धावता नवनिर्मिती आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच, पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी त्यांच्याशी नियमित संवाद साधण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
सुरुवातीला अंकित दमाणी यांनी जामश्री ग्रुपच्या प्रवासाची माहिती दिली, तर कुलसचिव प्राणेश मुरनाळ यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या मूल्यव्यवस्थेची ओळख करून दिली. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड व कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. अनंत चक्रदेव, प्रा. प्रभा कासलीवाल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT