atul benke 
पुणे

(व्हिडिओ) राष्ट्रवादीच्या या आमदाराचा भाजप सरकारवर गैरव्यवहाराचा आरोप

पराग जगताप

ओतूर (पुणे) : राज्यातील भाजप सरकारच्या काळात द्राक्ष पीक विमा हा पाच वर्षातील सर्वात मोठा न दिसणारा गैरव्यवहार असून, तो आपल्या शेतकरी बांधवांना सोसावा लागला आहे, असा आरोप आमदार अतुल बेनके यांनी केला आहे.

जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथे चक्रीवादळाने द्राक्ष पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रशासकीय दौऱ्यात पाहणी करून खासदार अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि या व पुढच्या हंगामातही द्राक्ष उत्पादक कसा अडचणीत आला आहे, हे कृषी अधिकाऱ्यांसमोर सविस्तर सांगितले. तसेच, विमा काढूनही मागील काळात हाती काहीच पडले नसल्याने विमा रक्कमेचा भार कर्जात वाढला असल्याने नाराजी व्यक्त केली. त्यावेळी बेनके यांनी आरोप केले. 

आमदार बेनके म्हणाले, मागील भाजप सरकारचा द्राक्ष पीक विमा हा पाच वर्षातील सर्वात मोठा न दिसणारा घोटाळा असून, तो आपल्या शेतकरी बांधवाना सोसावा लागला. कारण, मागिल सरकारने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सक्तीने द्राक्ष पीक विमा भरून घेतला, मात्र सर्व निकषास पात्र ठरूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळेच भाजप सरकारच्या काळातील भारतातील सर्वात मोठा हा शेतकऱ्यांबाबत न दिसणारा गैरव्यवहार आहे.

या वेळी सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे, तालुका कृषी अधिकारी एस. के. शिरसाठ, विघ्नहर संचालक रघुनाथ लोहोटे, सदाशिव ताम्हणे, जितेंद्र बिडवई, राजेंद्र बिडवई, जयवंत डोके, राजेंद्र ताम्हाणे, शकंर ताम्हाणे, गणपत मेहेर, राहुल शेटे, दीपक कोकणे, संदिप माळी, मोहन डोके, बाळू काळे, गणेश लोखंडे, भगवान बिडवई, शंकर लोहोटे आदी उपस्थीत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT