Shivneri 
पुणे

जुन्नर तालुक्याचे नाव शिवनेरी होणार?

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : अवकाळी पाऊस व शेतकऱ्यांना मदत याविषयी बोलताना तिजोरीत पैसे नसल्याचे सांगण्यात येते. यासाठी आपले निम्मे मानधन देण्यास माझी तयारी असून विधानसभा सदस्यांची यासाठी संमती घ्यावी. दर पाच किलोमीटर अंतरावर हवामानाचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा बसवावी. शेतकरी विम्यात द्राक्ष व ज्या इतर फळाचा समावेश नाही तो करण्यात यावा. तालुक्‍यातील महसूल, आरोग्य, पोलिस, जलसंपदा आदी विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी. जुन्नर तालुक्‍याचे नाव शिवनेरी तालुका करण्यात यावे, अशा मागण्या आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत केल्या.

पुरवणी मागण्यांवर बेनके बोलत होते. माणिकडोह (ता. जुन्नर) येथील जलसंपदा विभागाची 15 हेक्‍टर जागा बिबट निवारा केंद्राचा विस्तार करण्यासाठी त्वरित देण्यात यावी, अशी मागणीही आमदार बेनके यांनी विधानसभेत केली. तालुक्‍यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट-मानव संघर्ष गंभीर झाला असून याची वनखाते गांभीर्याने दखल घेत नाही, असे सांगून बिबट्याचा प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता 42 बिबट्यांची आहे. येथून जवळच असलेल्या जलसंपदा विभागाच्या जागेची मागणी वनविभागाने केली आहे. दोघांमधील हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. येथील पाच हेक्‍टर जागेवरील जलसंपदा विभागाच्या कॉलनीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे. मागील सरकारने जाहीर केलेली बिबट सफारी होण्यास विलंब लागणार असल्याने ही जागा वन विभागास दिल्यास बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढण्यास मदत होऊन वर्षभरात बिबट्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे बेनके यांनी सांगितले.

बेनके म्हणाले, ""बिबटे पकडण्याऐवजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांना बिबट्या बरोबर मैत्री करा असे सांगितले जाते. वन्यप्राण्यांचे जतन व संवर्धन करा, अन्यथा पुढील पिढीला बिबट्या फोटोत दाखवावा लागेल, असे वनविभागाचे अधिकारी सांगतात. पण बिबट्याची वाढलेली संख्या व होणारे हल्ले पाहता आता स्थानिकांचे फोटो घरात लागण्याची शक्‍यता वाढली आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT