pune police sakal
पुणे

Bhaskar Jadhav: राणे पितापुत्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; जाधवांवर पुण्यात गुन्हा दाखल

सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे राणे यांचे खासगी स्विय सहायक आहेत. बुधवारी दुपारी ते डेक्कन परिसरातील गुडलक हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक पहात होते.

त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी या मोर्चामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिनकरण्याच्या हेतूने अर्वाच्छ भोषत वक्तव्य केले.

त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या. तसेच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यास चिथावणी दिली. केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीककेल्याप्रकरणी शिंगटे यांनी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

SCROLL FOR NEXT