Canal 
पुणे

मेट्रो खोदकामातील रसायनमिश्रित पाणी सोडलं कॅनॉलमध्ये; कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

धनकवडी (पुणे) : स्वारगेट चौकातील मेट्रो स्थानकाचे खोदकामातील रसायन मिश्रित सांडपाणी मुठा उजवा कालव्यात सोडल्या प्रकरणी फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी राज्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली.

पुण्यातील स्वारगेटच्या जेधे चौकात एस. टी. स्थानकाच्या भागात मेट्रो स्थानकाचे खोदकाम सुरू आहे. या कामाचे महामेट्रोचे कंत्राटदार टाटा-गुलेरमार्ग आणि जे. कुमार इन्फ्रा यांच्याकडून खोदाई दरम्यान निघालेले रसायन मिश्रित सांडपाणी मुठा कालव्यात बेकायदा सोडण्यात आले आहे. या कालव्याचे पाणी दौंड, इंदापूर भागातील शेतकरी शेती आणि पिण्यासाठी वापरत असल्याने या घटनेमुळे त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अद्यापही खोदकामातील रसायनमिश्रित पाणी पाईपलाईनद्वारे मुठा उजवा कालव्यात सोडण्यात येत आहे. याप्रकरणी पुणे पाटबंधारे शाखेच्या सहाय्यक अभियंत्यांनी दोन्ही कंत्राटदारांना नाममात्र प्रत्येकी १५०० रुपये दंड आकारला आहे. ही बाब गंभीर असून याप्रकरणी कंत्राटदारांकडून शेतकरी,
नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार घडत असताना आपल्या स्तरावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी, असे तापकीर यांनी सांगितले.

तापकीर म्हणाले, ''दूषित पाणी कॅनॉलमध्ये न सोडता महापालिकेच्या पावसाळी लाईनद्वारे सोडले असते, तर कॅनॉल दूषित झाले नसते. खोदकामातील रसायनमिश्रित पाणी थेट पाईपलाईनद्वारे मुठा उजवा कालव्यात सोडण्यात येत आहे. हेच पाणी शेतकरी पिण्यासाठी, शेतीसाठी वापरत आहेत. पाटबंधारे विभागाने नुसता दंड आकारून प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करावे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT