mla jitendra awhad offensive statement of lord ram burn his statue at narayangaon Sakal
पुणे

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे नारायणगावात दहन

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे जोडे मारून दहन

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : प्रभू राम यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणारे माजी मंत्री,आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले.

येथील बसस्थानक चौकात आज सायंकाळी झालेल्या निषेध सभेतआमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे अशीष माळवदकर,अक्षय खैरे ,नामदेव खैरे,उमेश अवचट,

ॲड.राजेंद्र कोल्हे,मोहक वाजगे ,प्रशांत पाटिल, अक्षय शिंदे, अक्षय डोके, नयन खैरे,अमित औटी,अक्षय कसाबेआदी उपस्थित होते.या वेळी जय श्रीराम, वंदे मातरम, प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

आशिष माळवदकर म्हणाले आमदार आव्हाड ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांना वेळीच लगाम घालावा.

या वेळी ॲड.राजेंद्र कोल्हे, नामदेव खैरे यांनी मनोगत व्यक्त करून आमदार आव्हाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT