Dilip Walse Patil sakal
पुणे

आमदार, खासदारांना घाऊक पद्धतीने विकत घेत देशात एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचा घाट

शिरूर बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील यांनी केंद्र शासनाच्या ध्येयधोरणांवर व तोडफोडीच्या राजकारणावर सडकून टीका केली.

नितीन बारवकर

शिरूर बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील यांनी केंद्र शासनाच्या ध्येयधोरणांवर व तोडफोडीच्या राजकारणावर सडकून टीका केली.

शिरूर - देशातील अनेक राज्यांत केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले असताना आमदार, खासदारांना घाऊक पद्धतीने विकत घेत सर्वसत्ताधीश म्हणून देशात एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येथे भाजपचा उल्लेख टाळून केला. या उद्योगांतून राज्यघटनेत बदल करून मनमानी करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

शिरूर बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील यांनी केंद्र शासनाच्या ध्येयधोरणांवर व तोडफोडीच्या राजकारणावर सडकून टीका केली ते म्हणाले, चूकीच्या आणि निश्क्रिय धोरणांमुळे केंद्र सरकारविरोधात आज नाराजीचे वातावरण आहे. मात्र, त्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केली जात आहे. लोकांचा कौल अजमावण्यापेक्षा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच घाऊक पद्धतीने खरेदी करून मनमानी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेशच्या निमीत्ताने जे दिसले तसे इतरत्रही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय च्या माध्यमातून घाबरविण्याचे आणि यंत्रणा उध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

चीन, पाकीस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, रशिया या शेजारी देशांशी भारताचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. देशाची आर्थिक स्थिती खालावली असताना शत्रूराष्ट्रांच्या कुरापती, चीनने केलेले अतिक्रमण आपल्याला परवडणारे नाही. सर्वांच्याच दृष्टीने ही चिंतेची बाब असून, वेळीच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

केंद्र सरकारने एका वर्षांत १५ गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर वळसे पाटील यांनी मिश्कील शैलीत टीका केली. एकदा तुमचे गॅस सिलिंडरचे टार्गेट संपले की, तुम्हाला सरपण गोळा करायला डोंगरालाच जायला लागेल असे ते म्हणाले. सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडर लागले तर ते अधिकची किंमत देऊन घ्यावे लागतील. डिझेल, पेट्रोलचे दर वाढलेत. देशाची स्थिती अडचणीत आल्याने सामान्यांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मोदी साहेब कितीही परदेशात जाऊन तेथील पंतप्रधानांना मिठ्या मारत असले तरी देशवासियांना महागाईच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT