राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन आमदार दिलीप मोहिते यांनी तेथील गैरकारभार चव्हाट्यावर आणला आणि आरोग्य उपसंचालकांना फोन करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार मोहिते यांनी रुग्णालयाला भेट दिली, तेव्हा प्रवेशद्वार अर्धवट उघडे होते. तेथे 8 डॉक्टर नियुक्त असताना, केवळ एक जण उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनमध्ये लेखनिक व शिपाई बसलेले होते. बहुतांश कर्मचारी जेवायला गेल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त असल्याने तो पदभार सांभाळणारे डॉक्टर चाकणला असल्याचे, तर दुसरे डॉक्टर पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले. एक वैद्यकीय अधिकारी अनेक दिवस गैरहजर आहेत. बुधवारी (ता. 22) डोंगरी भागातील एका गर्भवतीला त्रास होत असताना उपचार करण्यास डॉक्टर नव्हते. बाहेरून डॉक्टर नेऊन उपचार करावे लागले. या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी रुग्ण आला, की त्याला पुणे किंवा पिंपरीला पाठविले जाते. सध्या लॉकडाउनमुळे एखाद्या गाडीतून रुग्ण पुण्याला नेणे जिकिरीचे ठरते.
"रुग्ण पुण्यालाच पाठवायचे असतील; तर या रुग्णालयाचा काय उपयोग?' असा सवाल मोहिते यांनी केला. तसेच, कोरोना आपत्तीच्या काळात सर्वांनी रुग्णालयात हजर राहणे आवश्यक असताना अनेक जण गैरहजर राहतात. रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. दाखल असलेल्यांना सेवा मिळत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी आरोग्य उपसंचालक संजय देशमुख यांना फोनवरून सांगितली व कारवाईची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.