ravindra dhangekar on MP Girish Bapat Death esakal
पुणे

MP Girish Bapat Death : गिरीश बापटांच्या निधनानंतर आमदार रविंद्र धंगेकर भावुक, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज (२९ मार्च) रोजी निधन झाले आहे. बापट मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील बापट यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. (bjp MP Girish Bapat Death)

कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांना नगरसेवक आमदार आणि खासदार हा मोठा राजकीय प्रवास पुणे शहराला लाभला. त्यांनी काम करताना समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात खासदार निधीतून कसबा गणपती मंदीरात भित्तीचित्र केलं आणि त्याच्या कार्यक्रमाला त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे गिरीश बापट साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेल.

त्यांनी मोठं काम केलं. राजकारणात काम करताना आजची परिस्थिती आणि बापट साहेबांच्या हातात असलेला पक्ष होता तेव्हा पक्ष चुकेल तेव्हा ते सूचना द्यायचे. जे समाजात बोलायचे तेच पक्षात बोलायचे. सर्व समाज त्यांच्यासोबत होता. त्यांचं काम पुढे घेऊन जाणे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असेही आमदार धंगेकर म्हणाले.

७ वाजता होणार अंत्यसंस्कार

गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत त्यांच्या शनिवार पेठ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहेत. तर संध्याकाळी ७ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT