mla siddharth shirole says water issue solved of 40 thousand people
mla siddharth shirole says water issue solved of 40 thousand people Sakal
पुणे

Pune News : चाळीस हजार नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागला- आमदार शिरोळे

समाधान काटे

शिवाजीनगर :" समाजाच्या भल्यासाठी आशानगर सोसायटीने जागा दिली ते आदर्श उदाहरण आहे. हा परिसर उंच आहे, रात्री उशिरा या भागात पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागून पुन्हा सकाळी लवकर उठून मुलांना शाळेत पाठवणे,डबा तयार करणे यामध्ये नागरिकांना कसरत करावी लागत होती, हे मी जवळून पाहिले.

पाण्याची टाकी लवकर पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभाग यांच्याशी वारंवार पाठपुरावा करून टाकीचे काम पूर्ण केले, आज टाकीचे उदघाटन असल्याने आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याचे चीज झाल्याचे समाधान वाटते, या टाक्यांमुळे शिवाजीनगर भागातील जवळपास चाळीस हजार नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागला." असल्याचा विश्वास आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ६० लक्ष लिटर व आशानगर येथील १२ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन शुक्रवार (ता.२६) दुपारी तीन वाजता माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे बोलत होते.

पुढे बोलताना शिरोळे म्हणाले, "वैदुवाडी, आशानगर,म्हाडा वसाहत, शिवाजी हौसिंग सोसायटी बहिरटवाडी,भोसलेनगर, यशवंत नगर, सहजीवन सोसायटी, गणेशखिंड रस्ता आदी शिवाजीनगर भागातील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

पूरग्रस्त वसाहतींचे पुनर्बांधणी आणि अन्य प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ते सोडविण्यासाठी पूरग्रस्त वसाहतींना राज्य शासनाने गावठाणाचा दर्जा द्यावा. बांधकामासाठी ३ एफएसआय द्यावा अशी मागणी राज्य शासनाकडे करत आहे.

या वेळी मोहोळ, प्रमोद भानगिरे,आदित्य माळवे, विनोद ओरसे, सुनीता वाडेकर, अनिता पवार,दत्ता खाडे,रवी साळेगावकर, गणेश बगाडे, आनंद छाजेड, प्रकाश ढोरे,,राजश्री काळे, मुकारी अलगुडे, सुधीर आल्हाट रमाताई कापसे,पराग गायकवाड महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT