Sunil Kamble Video Esakal
पुणे

Sunil Kamble Video: आमदार सुनील कांबळेंची पुणे जिल्हाधिकाऱ्यांना हक्कभंग कारवाईची धमकी; दोन मारहाणीचे तर तिसरा धमकीचा व्हिडीओ व्हायरल

Sunil Kamble Video: भाजप आमदार सुनील कांबळे यांचा आजचा सकाळपासूनचा तिसरा व्हिडीओ समोर आला आहे. आमदार सुनील कांबळेंची पुणे जिल्हाधिकाऱ्यांना हक्कभंग कारवाईची धमकी, तर दोन मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप आमदार सुनील कांबळे यांचा आजचा सकाळपासूनचा तिसरा व्हिडीओ समोर आला आहे. ससून रुग्णालयातील सुनील कांबळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. आमदार सुनील कांबळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांवर हक्कभंग कारवाई करू असं वक्तव्य केलं आहे.

आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाच्या कोनशिलेवर नाव टाकलं नाही म्हणून आमदार कांबळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावर भडकले. कांबळे यांनी माझे नाव का नाही असा प्रश्न देशमुखांना विचारला. यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी, "तुमचे नाव लिहले आहे तुम्ही माहिती घेऊन बोललं पाहिजे" असे उत्तर दिले. यासंबधीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

दरम्यान आज त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

कोण आहेत आमदार सुनील कांबळे?

आमदार सुनील कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदार संघ आहे. आमदार पदाची ही त्यांची पहिलीच टर्म आहे. याआधी त्यांचे भाऊ दिलीप कांबळे हे या मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. दिलीप कांबळे हे माजी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत.

सुनील कांबळे पुणे महापालिकेत भाजपचे अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत. सुनील कांबळे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. सुनील कांबळे यांच्यावर पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी शिवीगाळ केल्याचाही आरोप झालेला आहे. त्याची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडिया आणि माध्यमांमधून व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT