MNGL domestic gas and CNG rate Reduction from midnight today
MNGL domestic gas and CNG rate Reduction from midnight today esakal
पुणे

CNG Rate : ‘एमएनजीएल’च्या घरगुती गॅस दरात ५.७० रुपयांची कपात; सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने (एमएनजीएल) पाइपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या घरगुती गॅस दरात प्रति एससीएममागे ५ रुपये ७० पैशांनी तर ‘सीएनजी’च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो सहा रुपयांनी कपात केली आहे. या कपातीची अंमलबजावणी (ता.७) मध्यरात्रीपासून केली जाणार आहे. यानुसार आता एमएनजीएलचा घरगुती गॅस प्रति एससीएम ५१ रुपये ३० पैसे आणि सीएनजी प्रतिकिलो ८६ रुपयांनी मिळणार आहे.

एमएनजीएल कंपनीने घरगुती गॅस आणि सीएनजी दर कपातीची घोषणा शुक्रवारी (ता.७) सायंकाळी केली. या दर कपातीचा फायदा पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तळेगाव येथील ग्राहकांना होणार आहे. सध्या घरगुती गॅसचा दर प्रति एससीएम ५७ रुपये तर, सीएनजीचा दर प्रति किलो ९२ रुपये इतका होता. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मान्यता दिल्यामुळे गॅस दराच्या कपातीची ही घोषणा करण्यात आल्याचे कंपनीच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने घरगुती गॅसच्या दरात ही कपात करण्यात आली असून कंपनीने कमी झालेल्या गॅसच्या किमतीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे, असे यासंदर्भात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण आणि तळेगाव यासह राज्यातील धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग आदी जिल्हयात गॅसचा पुरवठा करत असते.

एससीएम म्हणजे काय?

एससीएम हे इंग्रजी भाषेतील सप्लाय चेन मॅनेजमेंट या तीन शब्दांचे संक्षिप्त (लघु) रुप आहे. मराठी भाषेत एससीएम या लघुरुपाचा अर्थ पुरवठा साखळी व्यवस्थापन असा आहे. ग्राहकांना पाइपद्वारे घरगुती गॅस पुरवठा करताना गॅसचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युनिटला एससीएम असे म्हटले जाते.

एससीएम आणि किलोमध्ये फरक काय?

किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे तर, एससीएम हे पाइपद्वारे पुरविला जाणाऱ्या गॅसचे मोजमाप करण्याचे दशमान पद्धतीतील एकक आहे. या दोन्ही मोजमापांची तुलना करावयाची झाल्यास, एक किलो म्हणजे १.१६२ एससीएम होय. म्हणजेच एससीएम हे किलोपेक्षा मोठे असलेले एकक आहे. यानुसार एक एससीएम म्हणजे १ किलो १६२ ग्रॅम इतका गॅस होय. म्हणजे एससीएम हे किलोपेक्षा १६२ ग्रॅमने जास्त असलेले एकक आहे, असे म्हणता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024 : केजरीवालांच्या भविष्यवाणीवर अमित शाहांचं उत्तर; म्हणाले, संविधानात कुठे लिहिलंय की मोदी...

James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

Latest Marathi News Live Update: केजरीवालांनंतर सोरेन यांना दिलासा मिळणार का? १३ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi: "इथं जन्मलो, इथंच मरणार, देशातून पुन्हा..."; ओवैसींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT