MNS activist help corona positive woman to get bed in hospital in pune 
पुणे

पुण्यात माणुसकीचे दर्शन; कोरोना पॉझिटिव्ह महिलेसाठी धावले कार्यकर्ते

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णाला बेड मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज रविवार पेठेतील टीबी आणि कोरोना असलेल्या एका महिलेला कुठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हता. यावेळ माणुसकी दाखवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्या महिलेला चाकण येथे बेड मिळवून दिला.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून, ८ ते १० तास रांगेत उभे राहून देखील रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन मिळत अशी स्थिती आहे.  तर दुसरीकडे व्हेंटिलेटर बेडच शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे.  नव्या कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी सुमारे साडेसात हजार बेड असल्या तरी; त्यात एकही ‘व्हेंटिलेटर’ बेड शिल्लक नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीच गुरुवारी स्पष्ट केले.

दरम्यान, ''दिवसेंदिवस शहरात कोरोना रुग्ण वाढताये. रुग्णाला बेड मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.लोक रस्त्यावर मरायला लागले आहेत.  पण कोणत्याही सत्ताधाऱ्याला काही एक पडलेलं नाही जनतेचं. अशा वेळी लोकांनी काय करायचं?'' असा सवाल  कसबा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT