चिंचवड - काळेवाडीतील मागील आठ महिन्यांपासून रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने ब क्षेत्रीय कार्यालयात मनसे महिला आघाडीने केलेले ठिय्या आंदोलन. 
पुणे

काळेवाडीतील समस्यांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्याला घेराव  (व्हिडिओ)

रवींद्र जगधने

पिंपरी - काळेवाडीतील विविध कारणांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्याने; तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सतत होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ मनसे महिला आघाडीने चिंचवड 'ब' क्षेत्रीय अधिकाऱ्याला घेराव घातला. त्या वेळी प्रशासनाने दुरुस्तीचे लेखी आश्‍वासन दिले.

प्रभाग क्रमांक 22 मधील पाचपीर चौक, पंचनाथ कॉलनी, ज्योतिबानगर, आदर्शनगर, राजवाडेनगर आदी भागांत खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अपघातात एका महिला गंभीर जखमी झाली. याबाबत आयुक्तांसह प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही दखल न घेतली नाही. त्यामुळे महिलांनी "ब' क्षेत्रीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करत क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांनी घेराव घातला.

महापालिका अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असून, नगरसेवकांच्या घरासमोरील खोदकाम मात्र बुजविले जाते, असा आरोप महिलांनी या वेळी केला. 

महिला शहराध्यक्ष अश्‍विनी बांगर, उपाध्यक्ष अनिता पांचाळ, सीमा बेलापूरकर, स्नेहल बांगर, संगीता देशमुख, रूपाली गिलबिले, आदिती चावरिया, लता गावखरे, सुनीता गायकवाड, दक्षता हेमंत डांगे, राजू अवसर, रूपेश पटेकर, मयूर चिंचवडे, श्‍याम जगताप, श्‍याम भालेराव, सुरेश सकट, विकास कदम, आकाश पांचाळ, मिलिंद सोनवणे, मच्छिंद्र चिंचोले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

याबाबत खोत म्हणाले, "काळेवाडीत काही कामे बीआरटी, पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुरू आहेत. या कामांवर मुख्य कार्यालयातून नियंत्रण असते. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT