Raj Thackeray  
पुणे

Raj Thackeray In Pune: पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे कडाडले; अजितदादा, शरद पवारांनाही डिवचलं

Mns chief Raj Thackeray on Pune Tour: राज ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनावर आगपाखड केली. अशा प्रकारचे सरकार चालतं का? असा थेट सवाल त्यांनी केला.

कार्तिक पुजारी

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मुसळधार पावसानंतर आलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते दौरा करत आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी सरकार आणि प्रशासनावर आगपाखड केली. अशा प्रकारचे सरकार चालतं का? असा थेट सवाल त्यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

पुणे हे एक शहर राहिले नाही, 4 शहर झाले आहेत. नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना फ्री घर देता आणि इथल्या लोकांना भीका मागायला लावता. राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी अजित पवारांवर देखील टीका केली आहे. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरणं वाहतात असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यातील एक पुण्यातील आहेत. ते ह्याठिकाणी नसताना देखील पूर आला. असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.

मुंबईला गेल्यावर या विषयावर बैठक घेणार आहे. तुम्हाला त्याबाबत माहिती मिळेल. पनवेल आणि ठाणेवरून साफ सफाई करण्यासाठी पुण्यात लोक आणावी लागतात. अधिकाऱ्याचे निलंबन करून प्रश्न सुटणार नाहीत. आता रोगराई वाढणार आहे याला जबाबदार कोण? महानगर पालिकेतील अधिकारी किंवा सरकार मधील अधिकारी यांच्यात साटंलोटं असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी शरद पवार यांना देखील टोला लगावला. शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल यासाठी हातभार लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्राची मणिपूरसारखी स्थिती झाली असती असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

जेव्हा सरसकट सर्वाना कायद्याची भीती वाटत नाही तोपर्यंत काही शक्य नाही. कल्याणीनगरमध्ये येवढा मोठा अपघात झाला. आज त्यांचा आई वडिलांचे काय चाललंय हे कोणाला माहिती नाही. मुंबईत ट्रॅफिक हवालदारांना टपली मरून पळून गेले. पोलीस सुरक्षित नसतील तर काय? महाराष्ट्रात जे चालू आहे ते दुर्दैवी आहे. ह्या सगळ्याचा राजकारणी लोकांनी विचार केला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT