पुणे

Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यातही धावणार मनसेचे "इंजिन' 

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व 21 जागा लढविण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. त्या अनुषंगाने मनसेकडून पुण्यासह राज्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांच्या बैठका घेण्यात येत आहेत. दरम्यान, निवडणूक लढविण्याबाबतचा अंतिम निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे दोन-तीन दिवसांत जाहीर करतील, असे सूत्रांनी सांगितले. 

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूकही लढणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीबाबत राज यांनी मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांशी नुकताच संवाद साधला. त्या वेळी निवडणूक लढविण्याबाबत ठोस भूमिका जाहीर केली नसली, तरी लवकरच निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. 

राज यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. ही "जवळीक' पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेमध्ये आघाडी होईल, असे चित्र दिसून येत होते. परंतु विधानसभेच्या शहरातील आठ आणि जिल्ह्यातील 13 अशा एकूण 21 जागांवर मनसे निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

मनसेकडून पुणे, औरंगाबादसह अन्य ठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी येथील मनसे कार्यालयात सोमवारी दिवसभर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांच्या बैठका पार पडल्या. 

मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, ""ईव्हीएमच्या घोळामुळे सर्व राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकावा, अशी पक्षाची भूमिका होती. राज ठाकरे यांच्याकडून पक्ष पातळीवर निवडणूक यंत्रणा उभारण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत इच्छुकांची यादी राज ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.'' 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मते 
1. वडगावशेरी : 18830 
2. शिवाजीनगर : 9809 
3. कोथरूड : 21392 
4. खडकवासला : 34576 
5. पर्वती : 12563 
6. हडपसर : 25206 
7. पुणे कॅंटोन्मेंट : 14642 
8. कसबा : 25998 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT