Congress reacts to allegations made on sharad pawar and ncp by Raj Thackeray  Raj thackeray
पुणे

पुण्यात मनसेला दुसरा धक्का, आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर होताच शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला.

मशीदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, हे त्यांचं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं. यानंतर मनसेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर पुण्यात दुसरा राजीनामा पडला आहे.

MNS

पुण्यातील माजीद अमीन शेख हे वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी आता राजीनामा दिला आहे. तसेच मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजात सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय.

यापाठोपाठ आणखी एक राजीनामा पडला आहे. कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा मनसेला 'राम राम' करत जिल्हाध्यक्ष रवींद्र गारुडकरांकडे राजीनामा सोपवलाय. राज ठाकरेंच्या 'त्या' भाषणानंतर मनसेला पुण्यात दुसरा धक्का बसल्याचं स्पष्ट झालंय. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झाल्याने घेतला हा निर्णय घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT