vasant more sanjay raut 
पुणे

'तात्या चांगलं चाललंय', पुण्यात वसंत मोरे आणि संजय राऊतांची भेट

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरात मनसेने पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनावरुन वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणांमध्ये इशारा दिल्याने यात आणखी भर पडली. ठाकरे यांनी पुण्यात महाआरती केली होती. या कार्यक्रमांना वसंत मोरे यांची उपस्थिती दिसली नाही. मोरे नाराज असल्याच्या बातम्या कायम चर्चेत राहिल्या. (Vasant More News)

मात्र, मोरेंनी यावर स्पष्टीकरण देणं टाळलं. त्यांच्या फेसबूक पोस्ट मार्फत त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनही केला होता. मोरे अन्य कोणत्या पक्षात जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र,त्यानंतरही मोरेंच्या सोशल मीडिया पोस्टवरून वादंग कायम आहे. यानंतर आज संजय राऊत पुण्यात आले होते. यावेळी वसंत मोरे यांनी राऊतांची भेट घेतली. (Vasant More meets Sanjay Raut)

मनसेत नाराज असलेल्या वसंत मोरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक केलं. पुण्यातील एका लग्नात दोघांची भेट झाली.

पुण्याचे सेनेचे शहराध्यक्ष लग्नात उपस्थित होते. त्यांनी वसंत मोरे यांची राऊतांसोबत भेट घडवून आणली. यावेळी ओळख करून देताना संजय राऊत यांनी मोरेंचं ठाण्यातील भाषण ऐकल्याचं सांगितलं. वसंत मोरे म्हणून नाही, तर तात्या म्हणून ओळखलं, असं राऊत म्हणाले. जाता जाता संजय राऊत मोरे यांना 'भेटू' असं म्हणाले. त्यामुळे मोरे आता शिवसेनेच्या जवळ आल्याची चर्चा आहे. याआधीही मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT