संभाजी ब्रिगेडला मनसेचा इशारा sakal
पुणे

"लायकीत रहायचं अन्यथा....", संभाजी ब्रिगेडला मनसेचा इशारा

संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता

सकाळ वृत्तसेवा

पु्णे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babsaheb purandare) यांचे शंभरीत पदार्पण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जातीयवाद करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड (pravin gaikwad) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

फेसबुक पोस्ट करत प्रविण गायकवाड म्हणाले, "राज ठाकरेंना जसं पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचं आकलन नाही. इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचे देखील सु्द्धा त्यांना आकलन नाही. राजकारणात कुठेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहे," अशी टीका गायकवाड यांनी केली. त्यावर मनसेने प्रत्तुत्तर दिले आहे.

याबाबत मनसेचे वसंत मोरे यांनी म्हटलं, "मी प्रविण गायकवाड, मी प्रविण गायकवाड असे गल्लो गल्ली सांगत फिरताना मी तुला स्वतः पाहिलंय. 2019 ला पुण्यातून लोकसभेला उभा राहायला इच्छूक असणारा तू, तुला काय राज ठाकरे कळणार. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू," असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

महाराष्ट्रत पूर्वीपासून जातीव्यवस्था होती आणि त्या जाती अभियमं बाळगण्यापुरत्याच होत्या. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून चित्र बदलले आहे. नागरिक जातीचा अभिमान बाळगण्यासोबत अन्य जातींचा तिरस्कार करत आहेत. राजकीय स्वार्थपोटी हे सर्व घडत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातिवंघ मुद्दा मोठ्या स्वरूपात मोठा झाला, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

Latest Marathi News Live Update : आजपासून वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

Pune News: सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; बचावासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी, Video Viral

LPU ची शैक्षणिक क्रांती! २.५ कोटींचे पॅकेज, इंडस्ट्री-बेस्ड डिग्री आणि 'ग्लोबल टेक इमर्शन'सह इंजिनिअरिंग शिक्षणाला दिली नवी दिशा

SCROLL FOR NEXT