mns Raj Thackeray removed loudspeaker on mosques statement made at Aurangabad Jamir Qazi resigns pune  sakal
पुणे

राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा

राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा

प्रफुल्ल भंडारी / विजय जाधव

राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा

दौंड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर काझी यांनी राजीनामा दिला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांच्याकडे जमीर सय्यद यांनी राजीनामा सादर केला आहे. राजसाहेब ठाकरे यांची भोंगे संबंधी भुमिका चुकीची असल्याचे सांगत जे पूर्वीपासून चालू आहे ते चालू राहिले पाहिजे. त्याचबरोबर १ मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दु: खविणारी आहे.

समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले. सलग १६ वर्षे मनसे मध्ये सक्रिय असलेले जमीर सय्यद यांनी मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्षपद, मनसे एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मागील ३ वर्षांपासून जमीर सय्यद दौंड शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जमीर सय्यद यांचे बंधू दहा वर्षे दौंड नगरपालिकेचे सदस्य होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी सदर राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. सामाजिक बहिष्काराच्या भीतीने राजीनामे दिले जात असल्याचे मत अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT