MNS 
पुणे

मनसेच्या इंजिनला चावी मिळणार; पुण्यात असणार 'हे' उमेदवार

सागर आव्हाड

पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षाची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र मनसेच्या इंजिनला आज (गुरुवार) चावी मिळणार असल्याने कार्यकर्ते आदेशाची वाट पाहत आहेत. आज मनसेची भूमिका स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

पुण्यातील कसबा, हडपसर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवार जाहीर होतील अशी माहिती मिळत आहे. मनसे जिल्ह्यात नवीन चेहेरे देईल कारण इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते मनसेच्या संपर्कात असून त्यांनी मनसे नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. जिल्ह्यातील शिरूर, खडकवसाला, पुरंदरपैकी एक जागा मनसे लढणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचा एक मोठा नेता मनसेच्या संपर्कात असून खडकवासला मतदारसंघ जर सेनेला सुटला नाही, तर मनसेचे तयारी या नेत्याने ठेवली आहे.
आज पुण्यातल्या जागा जाहीर होतील असा अंदाज आहे. नेत्यांना दोन जागांवर तयारी करायला लावली आहे.

लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून राज्यभर घेतलेल्या झंझावाती सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्षांच्या तुलनेत मनसेने नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला होता. मनसेची ताकद असलेल्या प्रामुख्याने कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर आणि कसबा या चार मतदारसंघात जोरदार लढा देण्याचे पक्षाचे नियोजन आहे. कसबा मतदारसंघातून रूपाली पाटील,  हडपसरमधून वसंत मोरे, यांच्या नाव आज जाहीर होऊ शकते. मात्र, इंजिनला राजसाहेबांचा आदेशाची चावी आज मिळेल हे निश्चित होईल

असे असतील उमेदवार
कसबा - रुपाली पाटील 
हडपसर - वसंत मोरे 
पुरंदर - बाबा जाधवराव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: एकाच महिन्यात महिलेचे तीनदा लग्न; बळजबरीमुळे कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पुण्यातून चालतंय लग्नाचं रॅकेट

Latest Marathi News Live Update : उद्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसेचा 20 वा वर्धापन दिन!

LPG Cylinder Booking Rules : सरकारने घरगुती LPG बुकिंगचे नियम बदलले, आता २१ दिवसांपूर्वी बुक होणार नाही दुसरा सिलिंडर, कारण काय ?

अमृता खानविलकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज! सुरु केला नवीन प्रवास, चाहत्यांना दिल 'खास' सप्राईज

Kolhapur College Crime: इंजिनियरींगच्या ५ विद्यार्थिनींना प्राध्यापकाने केबीनमध्ये बोलवलं अन् घडलं भयानक; कोल्हापूरमध्ये प्रकार

SCROLL FOR NEXT